- विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग..
- विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पिंपरीतील एच.ए. शाळा माध्यमिक विभागात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. सहभागी व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार महेश लांडगे व भाजयुमो पिंपरी-चिंचवड अध्यक्ष दिनेश यादव होते. स्पर्धेचे आयोजन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमित देशमुख यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक समीर मासुळकर, भाजयुमो महामंत्री दिनेश काटे, सचिव आदम मुलानी, जगदीश येवले, नितीन साळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका दर्शना कोरके, उपमुख्याध्यापक पोपटराव माने व चित्रकला शिक्षक चार्य सर यांचे विशेष सहकार्य लाभले.


















