न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०५ ऑक्टोबर २०२६) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली आणि विविध सर्जनशील उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा व सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
यावेळी ‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनांवर मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, घोषवाक्य लेखन, पोस्टरनिर्मिती व भित्ती सजावट केली. पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी बर्ड व्हॅली परिसरात श्रमदान केले. आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘Reuse and Recycle’, रस्ते सुरक्षा व वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती रॅली काढली. नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले.
यावेळी आमदार अमित गोरखे, विलास जेऊरकर, डॉ. प्रिया गोरखे, समीर जेऊरकर, मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड व उपमुख्याध्यापिका वैशाली हरुगडे उपस्थित होते.


















