न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- सामाजिक समता आणि एकात्मतेचा तत्वज्ञान रूजवणारा हा वारीचा सोहळा गेली शेकडो वर्ष अविरत सुरू आहे. जाती, वर्ण, धर्म, प्रांत, भाषा या क्षुद्र भेदाभेदांना विसरायला लावणा-या या वारी सोहळ्यात “पंढरीची वारी जयचिये कुळी ! त्याची पायधुळी लागो मज ” !! या उक्तीप्रमाणे दरवर्षी लाखो वैष्णवांची सेवा करण्यास मिळणे हे अहोभाग्यच.
सालाबादप्रमाणेच जगतगुरू संत तुकाराम महाराज स्वागत पालखी सोहळा ट्रस्ट (रजि), असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट (रजि.) पुणे आणि महाराष्ट्र मजदुर संघटना (माथाडी कामगार) यांच्या संयुक्त विद्यामानाने उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील सेक्टर नं. २३, भक्ती शक्ती चौक ट्रान्सपोर्टनगर येथे दिंडी प्रमुखांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी वारकऱ्यांना टाळ वाटप, फराळ वाटप व आदी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. माथाडी कामगारांनी आणि असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे च्या सर्व सदस्यांच्या वतीने कष्टक-यांच्या पालखी सोहळा स्वागत कक्षात उपस्थिती दर्शवून, वैष्णवांची सेवा करण्याचा लाभ घ्यावा व आम्हासही वैष्णवांबरोबर सेवा करण्यासाठी उपकृत करावे, असे कामगार नेते इरफान सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.















