न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २४ जून २०१९) :- टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन (टीएमईयू) चे पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे प्रतिनिधीसाठी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या युनियनमध्ये ६५०० हून अधिक सदस्य आहेत. या सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग दाखवल्याने मतदानाचे प्रमाण ९९ टक्क्यांवर पोहोचले. याबाबत टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन, पुणे निवडणूक समितीचे अध्यक्ष विजय सुदर्शनी यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, १५५ उमेदवारांमधून युनियनचे ३१ प्रतिनिधी निवडले गेले. यातील ११ प्रतिनिधी आधीच्या कमिटीमधील आहेत. मागील कमिटीच्या कामाबद्दल समाधान आणि विश्वास दाखवत या ११ प्रतिनिधीना पुन्हा एकदा विजयी करण्यात आले. युनियनच्या सदस्यांना लोकशाही पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडून सक्षम करण्याची एक उत्तम उदाहरण म्हणजे या निवडणुका. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन पुणे निवडणूक समिती ८ यांच्या सदस्सीय समितीने पाहिली. ही निवडणूक प्रक्रिया टाटा मोटर्स पिंपरी, चिंचवड व चिखली या कारखान्यांमध्ये पार पडल्या. ह्याप्रसंगी निवडणुका अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या बद्यल विजय सुदर्शनी, अध्यक्ष, निवडणूक समिती टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन पुणे यानी समाधन व्यक्त केले.
विजय सुदर्शनी, अध्यक्ष, निवडणूक समिती टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन पुणे संपूर्ण कमिटी, उमेदवार आणि आमच्या सदस्यांनी (टाटा मोटर्सचे कर्मचारी) आपले नवे प्रतिनिधी निवडून देण्यासाठीच्या या लोकशाही प्रक्रियेत दिलेला सहभाग आणि सहकार्य यासाठी आभारी आहे. आम्हाला आवश्यक पाठिंबा तसेच निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी व्यवस्थापनाचेही आभार मानतो.” येत्या काही दिवसांत, कार्यकारणी मंडळाचे सदस्य निवडण्यासाठी नव्याने निवडून आलेले सदस्य अंतर्गत निवड प्रक्रिया पार पाडतील.
३० वर्षांपूर्वी स्थापन झालेली टीएमईयू ही महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी कर्मचारी युनियन आहे आणि व्यवस्थापनासोबत समन्वय आणि सामंज्यसाने काम करण्याचा त्यांचा आजवरचा इतिहास आहे. टीएमईयू ही सीव्हीबीयू, पीव्हीबीयू, ईआरसी, जेएलआर आणि पिंपरी व चिंचवड येथील प्लांटमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी युनियन आहे, असे टाटा मोटर्स एम्पलॉई युनियन, पुणे निवडणूक समितीचे अध्यक्ष विजय सुदर्शनी यांनी म्हटले आहे.















