- ४० ग्रॅम एमडीसह ४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त; दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २१ नोहेंबर २०२६) :- चिखली परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४० ग्रॅम ५१० मिलीग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, मोटारसायकल, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास मोरे वजनकाटा, मोरे पाटील चौक, कुडळवाडी, चिखली येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी इस्तीयक इक्बाल चौधरी (वय ३३, रा. चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. तर सलीम शेख नावाचा दुसरा आरोपी फरार असून त्याचा पूर्ण पत्ता पोलिसांना अद्याप समजू शकलेला नाही.
अटक केलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने जप्त करण्यात आलेले एमडी अमली पदार्थ सलीम शेख याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि चव्हाण करीत आहेत.


















