- मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ लाखांची देणगी!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ नोव्हेंबर २०२६) :- दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ प्रभारी अनुप अविनाश मोरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या मदतीचा पाच लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सामाजिक कार्याची जाणीव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांना या कठीण काळात आर्थिक आधार मिळावा, तसेच गरजू बांधवांच्या मदतीसाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे यावे, या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही देणगी जमा करण्यात आली.
अनुप मोरे म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून विविध दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध करून दिली जाते. या सामाजिक उपक्रमात योगदान देत पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
संकटाच्या काळात गरजू बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच आपले कर्तव्य आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
अनुप मोरे यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक होत असून, समाजातील इतर घटकांनीही गरजू आणि संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

















