- ओएलएक्सवर कारची जाहिरात पाहून व्यवहार केला; पैसे घेतल्यानंतर आरोपी गायब, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ नोहेंबर २०२६) :- ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुन्या चारचाकी गाडीची खरेदी करण्याच्या प्रयत्नात एका तरुणाची ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आशिष अरुण बढे (वय २८) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांना वडिलांसाठी जुनी चारचाकी गाडी खरेदी करायची होती. त्यासाठी ते ओएलएक्सवर गाडी शोधत असताना त्यांना मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार दिसली. संबंधित आरोपी निलेश सूर्यवंशी याने गाडी देण्याचे आमिष दाखवून कार खरेदीसाठी ७५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
तक्रारदाराने पैसे पाठविल्यानंतरही आरोपीने गाडी दिली नाही. त्यानंतर तक्रारदाराने वारंवार फोन करून गाडीबाबत विचारणा केली असता, आरोपीने गाडीचा टॅक्स भरण्यासाठी आणखी पैशांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यास नकार दिला. तसेच ओएलएक्सवरून जुनी गाडी विकत देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

















