- जगताप डेअरीकडून वाकडच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ नोव्हेंबर २०२६) :- वाकडच्या मॉन्ट वर्ट सोसायटी बीआरटी बसस्टॉपजवळ शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ब्रेझा कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर ही ब्रेझा कार बीआरटी मार्गाच्या एका लेनमध्ये अडकून पडली. त्यामुळे जगताप डेअरीकडून वाकडच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, अपघातग्रस्त कार रस्त्यावरून हटविण्याची प्रक्रिया वाहतूक पोलिसांनी वेळेत पुर्ण केल्याने वाहतूक सुरळीत झाली. अपघातात कोणाला दुखापत झाली आहे का, तसेच अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

















