न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी भोसरीकर सज्ज झाले आहेत. विठुरायांच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारक-यांना येथील संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने चार टन मोतीचूर लाडूचे वाटप केले जाणार आहे.
यासाठी अकराशे किलो साखर, पन्नास तेलाचे डब्बे, दोन टन बेसनाचे पीठ, दोनशे किलो रवा, सोळा किलो काजू, बदाम अशा सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून लाडू बनविण्याचे काम सुरू आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणशेठ गवळी म्हणाले की, गेले सात वर्षांपासून वारक-यांची सेवा करण्याचे कार्य सुरू आहे. यासाठी चंद्रकांत वाळके, शामराव फुगे, बापूसाहेब काचोळे, ज्ञानेश्वर विधाते, शिरीष हिवाळे, किसन शिंदे, राहुल गवळी, किशोर गवळी व श्री गणेश तरुण मंडळातील कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले. आमदार महेश लांडगे व नगरसेवक सागर गवळी यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.











