न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत जुन्या व माजी पदाधिका-यांना कामगारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. एकूण ३१ पैकी तब्बल २१ उमेदवार प्रथमच निवडून आले आहेत. तर, युनियनचे विद्यमान अध्यक्ष समीर धुमाळ हे पुन्हा विजयी झाले आहेत. युनियनची निवडणूक ३ वर्षांऐवजी ५ वर्षांनंतर शनिवारी (दि. २२) रोजी झाली. त्यात विद्यमान ३८ पदाधिका-यांपैकी केवळ १० जण पुन्हा निवडून आले आहेत.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
नीलेश बोरकर, रितेश पिसाळ, विलास सपकाळ (एच ब्लॉक)
संतोष दळवी, राजेश कोलते ( पीई ),
अबदाली सय्यद (आरएटीपी), राजू धुमाळ पाटील, मारुती चाकोर (ईआरसी)
संतोष सपकाळ ( चिंचवड फॉउंड्री)
सुभाष हुलावळे, औदुंबर गणेशकर, किरण बोरगे (ई ब्लॉक)
मानदेव शिंत्रे, अशोक माने, समीर धुमाळ, सुशील नहार, सतीश काकडे (डी ब्लॉक)
मंगेश शिर्के, शिशुपाल तोमर, शशिकांत कात्रे (टीएमडी)
नरेंद्र पालांडे, विक्रम वरपे, सतीश धुमाळ (जे ब्लॉक-झिऑन, पेन्ट)
संजीव असवले, सुरेश झावरे ( केए टीसीएम शॉप)
योगेश तळेकर (केबी पेन्ट शॉप)
अजित पायगुडे, राजू नातू (केसी एब्ल्यूईएलडी शॉप)
नवनाथ गायकवाड (केडी प्रेस शॉप)
संतोष कापसे (केई इंजिन शॉप)
सचिन लांडगे (केएफ ट्रान्स एक्सल)
येत्या २ ते ३ दिवसांत निवडून आलेल्या ३१ उमेद्वारांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस व सदस्य या पदांसाठी निवड केली जाणार आहे.











