न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरीत संविधान सन्मान समन्वय समितीच्या वतीने रविवारी (दि. २३) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीतील महिला व मुलींनी लोकशाही जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तसेच या रॅलीत महिला, मुली उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या संविधान सन्मान रॅलीत कागद, काच, पत्रा संघटनेच्या सोनाली कुंजीर, रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, मुक्तीवादी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हिंदुस्तान अॅन्टीबॉयोटिक्स कंपनी शेजारील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषाची वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, अशा विविध घोषणा देण्यात येत होत्या. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास महिलांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
दरम्यान, मुक्तीवादी संघटनेकडून विविध गाणी सादर करण्यात आली. उपस्थितीत नागरिकांसमवेत संविधानाची प्रतिज्ञा सादर करुन रॅलीचा समारोप करण्यात आला











