- सिल्व्हरराइज ग्रुपच्या नव्या प्रकल्पाचे उद्या लॉन्चिंग!
- खा. श्रीरंग बारणे आणि आ. महेश लांडगे यांच्या हस्ते होणार उद्घाटन..
- उत्कृष्ट नियोजनासह दर्जेदार सुविधा देण्यावर भर – संतोष बारणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- मोशी परिसराच्या विकासात भर घालणाऱ्या सिल्व्हरराइज ग्रुपच्या महत्त्वाकांक्षी ‘सिल्वर गॅलेक्सी’ या भव्य निवासी आणि कमर्शिअल प्रकल्पाचा लॉन्चिंग सोहळा शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे. मोशीतील सर्वात मोठी टाउनशिप म्हणून हा प्रकल्प विकसित करण्यात येत असून, आधुनिक जीवनशैलीला पूरक सुविधा, उत्कृष्ट नियोजन आणि दर्जेदार बांधकाम ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सिल्व्हरराइज ग्रुपचे अध्यक्ष संतोष बारणे म्हणाले, ‘मोशी परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ‘सिल्वर गॅलेक्सी’च्या माध्यमातून ग्राहकांना नियोजनबद्ध टाउनशिपचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा सिल्व्हरराइज ग्रुपचा प्रयत्न आहे. उत्कृष्ट पायाभूत सुविधा, आधुनिक सोयीसुविधा आणि रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांना कमी कालावधीत घरांचा ताबा (पझेशन) देण्याचे उद्दिष्टही ग्रुपने ठेवले आहे. त्यामुळे मोशीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात या नवीन प्रकल्पाच्या लॉन्चिंगकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील मान्यवर, ग्राहक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


















