- समितीच्या जलदुत व आरोग्य दूतांनी दिली वारकऱ्यांना आरोग्य सेवा.
- वाहतूक नियमन तसेच बंदोबस्तासही केले सहकार्य
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पूजाविधी करून सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले. यंदा पालखी मार्गावर उन्हाची काहिली वाढलेली होती. देहू वेस परंडवाल चौकाच्या पुढे निगडी भक्ती शक्ती चौकापर्यंत काही वारकरी बंधू आणि भगिनींना उष्णतेचा त्रास जाणवू लागला.
तातडीने त्यांना समितीच्या जलदुत आणि आरोग्य दूतांनी शुद्ध जल, ग्लुकोजची व्यवस्था करून त्यांना प्राथमिक उपचार दिले. अश्याप्रकारे वाढत्या तापमानाचा त्रास जाणवणाऱ्या भक्त वारकरी बंधू आणि भगिनींना वेळेवर उपचार देण्याचे कार्य प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवकांनी आज रोजी पार पाडले. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या आरोग्य दूतांचे कौतुक केले.
के एन बी चौक, परंडवाल चौक, अनगडबाबा शाह दर्गा परिसर, शनी मंदिर चिंचोली या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा समितीच्या २० वाहतूक पोलिस मिंत्रानी दोन दिवस वाहतूक विभागस विशेष सहकार्य केले. समिति अध्यक्ष विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली जलदूत म्हणून जयेन्द्र मकवाना, स्वप्निल चव्हाणके, कुलदीप डांगे, अभिजीत जोशी, तुकाराम दहे, मौसमी घाळी, देवयानी पाटील, विभावरी इंगळे, सुलभा धांडे, रजनी बोंडे, अनामिका नारखेड़े, विजया पाटील, अँड विद्या शिंदे, तुकाराम दहे, मनोज ढाके, पटेल रज्जाक यांनी काम पाहिले.

आरोग्य दूत म्हणून बळीराम शेवते, सतीश देशमुख, लक्ष्मण इंगवले, नाना कुंबरे, उमेश कांगुडे, प्रदीप पिलाने, सुनील चौगुले, मदन जोशी, दन्यानेस्वर गोरे, राम सुर्वे, राजकुमार कांबिकर, संदीप सपकाळ, अविनाश भालेकर, मंगेश घाग, संकल्प सुर्यवंशी, सौरभ उत्तेकर, तेजस सापरिया, नितिन मांडवे, विशाल शेवाळे, सतीश मांडवे, अजय घाडी, कपिल पवार, समीर चिले, राहुल लुगड़े, अमित चौहान यांनी काम पाहिले.
वाहतूक पोलिस मित्र म्हणून अमोल कानू, संतोष चव्हाण, अमित डांगे, बाबासाहेब घाळी, राजेश बाबर, अर्चना घाळी दाभोळकर, विजय मुणोत यांनी काम पाहिले.
या प्रसंगी समितिस विशेष मार्गदर्शन पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहा. पोलिस आयुक्त नीलिमा चौधरी, श्रीकांत मोहिते, धीरेन्द्र जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी केले.
“या वर्षी वाढत्या तापमानामुळे भोहळ येवून,चक्कर येवून पडनाऱ्या वारकरी बंधु आणि भागिनिंची संख्या २० च्या पुढे आढळून आली” तसेच अनेक वाट चुकलेल्या वारकऱ्याना त्यांचे क्रमांक दींडी पर्यंत पोहचविन्याचे काम समिति स्वयंसेवकानी केले.”











