न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- भोसरीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि चालू असलेल्या विकास कामांचा आमदार महेश लांडगे यांनी आज (मंगळवारी) आढावा घेतला. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, विद्युत विभागाचे प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, संजय कुलकर्णी, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, वायसीएमचचे अधिष्ठता डॉ. राजेश वाबळे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, नितीन बो-हाडे बैठकीला उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, चिखलीतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचे काम हाती घ्यावे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला चालना द्यावी. समाविष्ट गावात ‘टीपी स्कीम’नुसार विकास कामे करावीत. २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी. पाणी पुरवठा सुरळित करावा.
भोसरीतील रुग्णालयात ‘ओपीडी’ सुरु करावी. विकास आराखड्यातील रस्ते, उद्यानाची कामे मार्गी लावावीत, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका अधिका-यांना दिल्या. तसेच ‘परिवर्तन’ हेल्पलाईनवर येणा-या तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही संबंधिताना तशा सूचना केल्या.















