न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- डॉ. डी. पाटील प्रतिष्ठान आकुर्डी संकुलातील वाय. बी. पाटील तंत्रनिकेतन मधील सर्व अभियांत्रिकी शाखांना म.रा.त.शि.मं. मुबई च्या वार्षिक परिक्षणांमध्ये सन २०१८-१९ सालामध्ये उत्कृष्ट श्रेणी प्राप्त झाली असुन इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाला अति उत्कृष्ट श्रेणी मिळाली आहे.
तसेच पदविका तृतीय वर्षातील ५० हून विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्या मध्ये विशेषतः केपीआयटी , गोदरेज, टाटा टेक्नॉलॉजी, स्लमबर्जे, विप्रो, सिमेन्स , मिन्डा ग्रुप , भारत फोर्ज इत्यादी कंपन्यामध्ये निवड चांगल्या वेतनावर झालेली आहे. यामधील बहूतांश विद्यार्थ्याना वार्षिक वेतन ३ लाखाच्या वर मिळाले असुन सरासरी २०५ लाखाचे वार्षिक वेतन मिळाले आहे. तंत्रनिकेतनाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
तसेच तृतीय वर्ष सिव्हील शाखेची विद्यार्थिनी कु. तन्वी सांडवची निवड इंडीयन एज्युकेशन सोसायटी (निम शासकिय) मध्ये वार्षिक ५ लाख ४० हजार रूपये वेतनावर करण्यात आली आहे. यामध्ये प्राचार्य प्रो. ए. एस. कोंडेकर, संकुल प्लेसमेंट डीन जस्मिता कौर , विभाग प्रमुख, शिक्षक वर्ग व प्रा. चंद्रु पट्टणशेट्टी यांनी विशेष प्रयत्न केले. वाय. बी. पाटील तंत्रनिकेतनची गेल्या ३५ वर्षाची शिक्षण क्ष्ेात्रातील यशाची परंपरा असुन, वरील यश कौतुकास्पद आहे या बद्ल संकुलाचे अध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, संचालक कर्नल(नि) एस.के. जोशी यांनी सर्वाचे अभिनंदन केले.















