- सुमारे ६६ कोटी ८० लाख ५६ हजार रुपयांच्या विकासकामांस स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने बोपखेल येथे नागरिकांच्या सोयीसाठी मुळा नदीवर पूल बांधण्यात येणाऱ असुन, त्यासाठी सुमारे ५३ कोटी ५३ लाख रूपये खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ६६ कोटी ८० लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. मनपाचे अ, ब, ग व ड क्षेत्रीय कार्यालयातील वृक्षतोडीसाठी मजुर कर्मचारी पुरविणेकामी येणाऱ्या सुमारे ६७ लाख १७ हजार खर्चास तर, मनपाचे क, ई, फ, व ह क्षेत्रीय कार्यालयातील वृक्षतोडीसाठी मजुर कर्मचारी पुरविणेकामी येणाऱ्या सुमारे ६७ लाख १७ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाच्या इंद्रायणी नगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ६७ लाख ४९ हजार रूपयांच्या खर्चास तर मनपाच्या अजमेरा टाकी परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ५० लाख १ हजार रूपयाच्या खर्चास व मनपाच्या पांजरपोळ परिसरात पाण्याच्या टाक्यांचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ८३ लाख २३ हजार रूपयाच्या खर्चास तसेच, नेहरूनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी १४ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १२ तळवडे येथे नव्याने स्मशानभुमी बाधणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ४९ लाख ७१ हजार रूपये खर्चास, प्रभाग क्र.१९ (नविन प्र.क्र १६) पेठ क्र. २९ येथे फुटबॉल ग्राउंड करणेकामी येणाऱ्या सुमारे ३ कोटी ९९ लाख ३५ हजार रूपये खर्चास, प्रभाग क्रमांक २५ मधील ताम्हाणे वस्ती ते पीडीसी बँकेपर्यंतच्या रस्त्याचा विकासकरणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ४६ लाख ३३ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मनपाच्या स.न. ९६ म्हस्के वस्ती येथील पंपिंग मशिनरीचे नुतनीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे ७५ लाख ६३ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलशुध्दीकरण केंद्र से. क्र. २३ येथे पाणी शुध्दीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप स्वरुपातील पॉली अल्युमिनीयम क्लोराईड व पावडर स्वरुपातील पॉली अल्युमिनीयम क्लोराईड पुरविणेकामी येणा-या सुमारे १ कोटी ४७ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात
आली. तसेच प्र. क्र. ९ मासुळकर कॉलनी मधील रस्त्यांवर विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांचे चर बुजविणेकामी येणाऱ्या सुमारे २६ लाख ६६ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.













