न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- महानगरपालिकेच्या कासारवाडी माध्यमिक विद्यालयाच्या साफिया रसिक शेख व प्रियांका सिद्धलिंगया कलशेट्टी विद्यार्थिनींचा सन्मान आज महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने भुवनेश्वर, ओडीसा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये सादर केलेल्या प्रकल्पाला सुवर्णा पदक मिळाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बगाटे व मार्गदर्शक शिक्षक प्रमोद राठोड, कार्यकारी अभियंता सतिश इंगळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


















