न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- झुंज दिव्यांग संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांना सन्मानित करण्यात आले.
१२० दिव्यांग घरकुल लाभार्थ्यांचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे बँकेचे कर्ज माफ केल्याबद्दल सत्कार करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे यांनी सांगितले.
आज महापौर दालनात झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक नामदेव ढाके, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, झुंज दिव्यांग संस्थेचे प्रतिनिधी बाळासाहेब मुळे, हरेश्वर गाडेकर, राजू आंमले, राहुल मगर, तात्या महापुरे, मल्हारी लोखंडे, रत्न गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.















