न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत शालेय साहित्य, गणवेश, बूट, रेनकोट, पुस्तके आदींचे वाटप १७ जूनपूर्वी करण्यात येणार होते.
शाळा सुरु होऊनदेखील अद्यापपर्यंत शिक्षण विभागाकडून याबाबत पाऊल उचलले नाही.याचा जाब विचारण्यासाठी शहर मनसेने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे यांनी हे आंदोलन केले.
यात राजू सावळे, बाळा दानवले, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, अनिकेत प्रभू, मयूर चिंचवडे, विकास कदम, विक्रम आडे, के. के. कांबळे, अनिता पांचाळ, सुरेश सकट, निखिल सावंत, संगीता देशमुख, श्रध्दा देशमुख, अनिल भुजबळ आदी मनसैनिक सहभागी होते.
शिक्षण मंडळाच्या अधिकारी जोस्त्ना शिंदे यांच्या वतीने पराग मुंडे यांना निवेदन दिले. परंतु, त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, शिंदे यांच्या खुर्चीवरच निशाना साधला व त्यांची खुर्ची उचलून त्यांच्या या बेजबाबदार कारभाराचा मनसैनिकांनी निषेध नोंदविला.
येत्या आठवडाभरात विद्यार्थ्यांन गणवेश व शालेय साहित्यांचे वाटप न झाल्यास मनसेच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण विभागात खळ-खटयाक आंदोलन केले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.















