न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- लहुमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने दहावी-बारावी पास-नापास विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर व विविध शासकीय योजनांची माहिती व उद्योग विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती लहुमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सौंदडे यांनी दिली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे रविवारी (दि. ३०) जूनला सायंकाळी चार वाजता मार्गदर्शन व करिअर मेळावा आयोजित केला आहे. यावेळी करिअरवर शिक्षणतज्ज्ञ प्रा. दिगंबर ढोकले व जिल्हा उद्योग केंद्रातील सेवानिवृत्त अधिकारी सुधीर जावळे हे मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावर राज्यमंत्री दर्जा असलेल्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमित गोरखे आणि संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज तोडरमल यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अनिल सौंदडे यांनी केले.


















