न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- महावितरणाच्या लघु व उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांशी समांतर व वीजखांबांच्या आधारे टाकण्यात आलेल्या अनधिकृत खासगी केबलमुळे अपघाताची शक्यता आहे. केबल ऑपरेटरर्सनी केबल्स तात्काळ काढून टाकाव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अनधिकृत केबल्स हटविण्याची जबाबदारी संबंधित अभियंता व जनमित्रांकडे देण्यात आली आहे. वीजखांब, वीजवाहिन्या, रोहित्र आदी ठिकाणी केबल टाकणे बेकायदेशीर आहे. विद्युत नियामक आयोगाने महावितरणच्या यंत्रणेवरील अनधिकृत केबलचे जाळे हटविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेवरील केबल हटविण्यासाठी महावितरणकडून कारवाई सुरू आहे. फक्त महानेट प्रकल्पाच्या केबलला शासनाने परवानगी दिली.
वीज यंत्रणेवरील अनधिकृत केबलमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. महावितरणाने संबंधित शाखा अभियंत व जनमित्रांवर केबल काढून टाकण्याची जबाबदारी निश्चित केली. शिवाय अनधिकृत केबल टाकणे किंवा त्यामुळे जीवितहानी मालमत्तेचे नुकसान झाल्यास केबल ऑपरेटर विरोधात फौजदारी तक्रार करण्यासोबत नुकसानभरपाईचा दावादेखील करण्यात येणार आहे.











