न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- चौकशीसाठी आणलेल्या तरुणाने पोलिसांच्या अंगावर धावून तसेच आरडाओरडा करत चौकीत गोंधळ घातला. हा प्रकार बुधवारी (दि. २६) रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास मोहननगर पोलीस चौकीमध्ये घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
योगेश दामोदर पवार (२९, रा. रामनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई बाबासाहेब साहेबराव पाखरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी पवार याला बुधवारी रात्री चौकशीसाठी पिंपरी पोलिस ठाण्याच्या मोहननगर चौकीमध्ये आणले होते. त्याचा राग आल्याने त्याने पोलिस कर्मचा-यांना अरेतुरेची भाषा वापरली.
तसेच अंगावर धावून शिवीगाळ करीत खुर्चीला लाथ मारली. त्यामुळे कपाटावरील टीव्ही खाली पाडला. पोलिसांनी पवारच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.











