न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- वाकड प्रभाग क्रमांक २५ मध्ये महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने १२ अनधिकृत पत्रा व प्लास्टिक शेडवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन पथकाने ही कारवाई करीत एकूण तेरा हजार चौरस फुटापेक्षा अधिक जागेवरील पत्रा व प्लास्टिक शेड हटवली. यावेळी उपअभियंता आबासाहेब ढवळे, कनिष्ट अभियंता व बीट निरीक्षक यांच्यासह १८ पोलीस, ३ जेसीबी व १६ महापालिका कर्मचारी असा फौजफाटा तैनातीस होता.










