न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- सीबीएसई पॅटर्न’चा अभ्यास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण समिती व अधिकाऱ्यांची टीम येत्या सोमवार दि. ८ व मंगळवार दि. ९ रोजी दोन दिवसीय दिल्ली दौरा करणार आहे.
दिल्लीतील आप सरकारने शाळांचे रुप पालटले असून सरकारी शाळा या पूर्णपणे डिजीटल केल्या असून या सरकारी शाळांचा पट हा खासगी इंग्लिश मीडियमच्या तुलनेत वाढला आहे.
शाळेमध्ये मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर स्वसंरक्षणाचे धडे तसेच शाळांमध्ये वर्षातून केवळ दोन परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. शाळा इमारत व स्वच्छता यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या साऱ्या कामांचे नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी हा अभ्यास दौरा केला जाणार आहे. यात महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते, शिक्षण समितीचे पदाधिकारी आदींचा समावेश असणार आहे.











