न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- लोणावळ्यातील भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. धरण फुल होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने धरणावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी धरणाच्या सांडव्यावरूून वाहणाऱ्या पाण्यात भिजून आनंद लुटला.
धरण ओव्हरफ्लो्लो झाल्याने लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढणार असल्याने परिसरातील व्यावयिकांनी देखील जल्लोष केला. तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मॉन्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. तीन दिवसात शहरात ४५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार कोसळणार्या पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने डोंगरातून येणार्या या पाण्यामुळे अवघ्या तिनच दिवसात धरण पुर्ण भरुन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले.
आज सोमवार असतानादेखिल धरण परिसरात आलेल्या पर्यटकांना धरणाच्या पायर्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेता आला. धरणाच्या पायर्यांवर लावण्यात आलेल्या लाकडी फळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून त्यानंतर पायर्यांवरुन मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात होणार आहे.















