न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- दुकाने अधिनियम कायद्याच्या अंतर्गत व्यवसायाच्या नोंदी होतात, मात्र विवरण पत्र भरण्याचे प्रमाण कमी आहे. आयकर विभागाकडे आर्थिक व्यवहाराची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. उत्स्फूर्तपणे आयकर भरल्यास करदात्यांचे स्वागतच आहे. मात्र कारवाई दरम्यान आढळल्यास दंडात्मक रक्कम मोठी आहे. यामुळे कर भरा आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावा, असे आवाहन आयकर विभागाचे मुख्य आयुक्त एस एस राणा यांनी केले.
निगडी येथील दि इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने ७० वा सनदी लेखापाल (सीए )दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त असीम शर्मा, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आयकर अधिकारी कमलजित सिंग, सीए शाखेचे उपाध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सचिव सीए पंकज पाटणी, खजिनदार सीए सचिन बन्सल, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए विजयकुमार बामणे ,सीए चंद्रकांत काळे, सीए शैलेश बोरे कार्यकारी सदस्य, माजी अध्यक्ष सीए चंद्रकांत दोषी, सीए चंद्रकुमार छाब्रा, सीए सुनील कारभारी, सीए विनोद इनामदार, सीए बबन डांगले, सीए प्रसाद सराफ आदी सदस्य सीए महेश्वर मराठे, सीए शामला कारभारी, सीए प्रकाश पमनानी आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ सनदी लेखपाल किशोर गुजर ,सीए प्रवीण पोकर्णा ,सीए विवेक लाहोटी, सीए कुन्तिलाल शिंगी, सीए नंदकिशोर तोष्णीवाल ,सीए रवी राजापूरकर,सीए एल बी लढढा, सीए पांडुरंग कवडे, सीए एस सी चोबे आदी जेष्ठ लेखपालांचा सत्कार करण्यात आला. तसेच सीए कुटुंब सीए जोडपे यांचा सत्कार करण्यात आला.











