न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- ॲमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन खरेदी केलेल्या कॅमे-याच्या बॉक्समध्ये वीट आली. याबाबत तरुणाने कित्येकदा तक्रार करुनही कंपनीने दाद दिला नाही. शेवटी सायबर सेलने पत्रव्यवहार करून सरसकट सर्वांना आरोपी करणार असल्याचा धमकीवजा इशारा दिल्याने कंपनी व्यवस्थापन जागे झाले. त्यांनी तरुणाच्या खात्यावर तत्काळ पैसे जमा केले.
सौरभ नाईक या तरुणाने ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरुन ३६ हजार ४९५ रुपयांचा कॅमेरा खरेदी केला होता. त्यासाठी सौरभने कंपनीच्या खात्यावर ऑनलाइन पैसे हस्तांतरित केले. ६ जून रोजी त्यांच्या घरी कॅमे-याचे पार्सल आले. त्यात पाहिले असता कॅमेऱ्याच्या बॉक्समध्ये बागकामासाठी वापरण्यात येणारी वीट आणि सिमेंटचे दगड आढळून आले होते.















