न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- पाठलाग करून तरुणीला सतत त्रास देणाऱ्या तरुणाला चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि. ३०) रोजी चिंचवड येथे घडला. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार रुद्रेश तुकाराम चौधरी (२३, रा. तालेरा रोड, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी रुद्रेश तरुणीचा सतत पाठलाग करत होता. तिला भेटण्याची गळ घालून मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणून तरुणाने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा वाजवून तिला हाक मारली. वारंवार होणा-या त्रासाला वैतागून तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.










