न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- भगवान महावीरांची साधना म्हणजे ध्यानसाधना होय. जीव म्हणजे व आत्मा आणि आजीव म्हणजे शरीर, शरीरासाठी आपण सर्व काही करतो. परंतु, आत्म्यासाठी ध्यानसाधनेची गरज आहे. त्यामुळे व्यक्ती आनंदी राहतो आणि आपल्या सानिध्यातील व्यक्तींनाही आनंदी ठेवतो, असे मत आचार्य शिवमुनी यांनी व्यक्त केले.
कासारवाडी येथील भक्ति शक्तिनगरमधील पगारिया सभागृहात आचार्य डॉ. शिवमुनी, प्रमुख शिरिषमुनी आणि युवाचार्य महेंद्रऋषी यांच्या आगमननिमित्त मिरवणूक व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी विमल बाफना, अविनाश चोरडिया आदी उपस्थित होते. आचार्यांचे भव्य मिरवणुकीने आनंदी स्वागत करण्यात आले. यानंतर युवाचार्य यांनी प्रवचनातून मार्गदर्शन केले. यावेळी आचार्यांच्या जीवनावर नाटिका सादर करण्यात आली.
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष संदीप फुलपगर यांनी केले तर, सूत्रसंचालन प्रा. अशोक पगारिया यांनी केले.











