न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- शहरातील तीनही मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात इच्छुक १३ जणांनी आपले अर्ज पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून सादर केले आहेत. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत अर्जांचा समावेश नाही. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या चेह यांना संधी दिली जाईल, असे जाहीर केले होते.
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार असून, १५ सप्टेंबर २०१९ च्या आसपास आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाने इच्छुकांना २७ जून ते १ जुलै या कालावधीत स्थानिक कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले होते. पिंपरी चिंचवड शहरात तीन मतदारसंघ असून या तीन मतदारसंघातील १३ इच्छुकांनी विहित मुदतीत पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.
विहित मुदतीत पक्षाकडे अर्ज सादर करणारे इच्छुक उमेदवार :-
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, विशाल वाकडकर, राजेंद्र काटे
पिंपरी विधानसभा मतदारसंघ
शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे, सुलक्षणा धर शिलवंत, गोरक्ष लोखंडे, सुनंदा काटे
भोसरी विधानसभा मतदारसंघ
विरोधी पक्षनेते दत्ता साने, दत्तात्रय जगताप, पंडित गवळी










