न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना जागृत ठेवत पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने डॉक्टर डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पिंपळे सौदागर परिसरातील डॉ. मेघना जाधव, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ.अनुराधा ज्ञानमोटे, डॉ. संतोष ज्ञानमोटे, डॉ. गोपाळ समधानी, वैद्य ओंकार बाबेल, डॉ. कुणाल शिंदे, डॉ. पंकज येवले, डॉ धनंजय वाघ, डॉ रमेश जगदाळे, डॉ पूजा तिलवाणी यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, किरण जगताप, कांचन काटे, आनंद हास्य क्लबचे सदस्य राजेंद्र जयस्वाल, अनिल कुलकर्णी, विठाई वाचनालयाचे सदस्य रमेश वाणी, जयपाल सिदनाळे, विवेक भिसे, श्रीकांत शिंदे यांच्यासह परिसरातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, अहोरात्र कष्ट करून अनेक वेळा आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.











