न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, मोगल बादशहा औरंगजेबाची निशाणी कायमची मिटवून या शहराचे नाव ‘संभाजीनगर’ असे केले होते. १९८८ च्या औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या ऐतिहासिक सभेत ही मागणी करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच शिवसेना औरंगाबादला ‘संभाजीनगर’ संबोधत आहे. हे नामकरण व्हावे म्हणून वारंवार शिवसेनेतर्फे प्रयत्न केले जातात, आंदोलनं केली जातात.
शिवसैनिक तथा शिवशाही व्यापारीसंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या आग्रही मागणीसाठी आंदोलन केले असता, पोलिस प्रशासनाने त्यांना राहत्या घरातुन अटक केली.
याच्या निषेधार्थ शिवशाही व्यापारी संघाचे सस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करीत, शिवसैनिकांनी केलेल्या कौतुकास्पद कार्यास शिवशाही व्यापारीसंघ संपूर्ण ताकदीनिशी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले.











