न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- सगाई आणि त्यांचे पती रामचंद्र ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना वयोमानानुसार शरीराची हालचाल करता येत नाही. त्यांचा सांभाळ विकी करीत नाही. तसेच तो वारंवार आई-वडिलांना त्रास देतो. सोमवारी दुपारी त्याने बहिणीच्या घरात घुसून बहिणीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. बहिणीच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारून तो तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत पसरवली.
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वेळोवेळी मारहाण करणा-या विकी रामचंद्र मारी (वय ३८, रा. जयभीमनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. सगाई रामचंद्र मारी (वय ६५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. ही घटना सोमवारी (दि. १) रोजी दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडली.











