न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- भोसरी एमआयडीसी परिसरातील औद्योगिक पट्ट्यात हरित एमआयडीसी करण्याचे उद्दिष्ट योजिले आहे. याबाबत भोसरी एमआयडीसीतील ‘टी ब्लॉक ९७’ येथे उद्या शुक्रवार (दि. ५) रोजी सायंकाळी चार वाजता वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फोरम ऑफ स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या वतीने दिली आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. वृक्ष लागवडीची खरी गरज औद्योगिक परिसरात आहे.
ज्या उद्योजकांना आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावयाची असेल, त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. सहभागी उद्योजकांना फोरमच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सर्व उद्योजकांनी व कामगार बंधू व पर्यावरण प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अभय भोर यांनी केले आहे.











