न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- शिवसेनेच्या वतीने ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अभियाना अंतर्गत चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग निहाय शिवसेना आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बैठका सांगवी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाल्हेकरवाडी या ठिकाणी संपन्न झाल्या व उर्वरित बैठका पुढील आठवड्यात संपन्न होणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकी दरम्यान विभागप्रमुख, उप विभागप्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व लोकसभा विजयाकरीता घेतलेल्या परीश्रमाबद्दल प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्याचे आभार व अभिनंदन करण्यात आले. प्रत्येक प्रभागात ४ शाखा प्रमुख व ४ महीला शाखा संघटिका यांच्या माध्यमातून शिवसेना सभासद नोंदणी कामकाजाचे नियोजन करण्याबाबत सूचना देऊन शिवसेना सभासद नोंदणीचा प्रभागनिहाय शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग तिथे शाखा सुरु करण्याबाबत सूचना देण्यात आल्या व शाखेमार्फत दैनंदिन कामकाजाचे स्वरूप काय असावे. शाखेमध्ये विविध समाज उपयोगी, कल्याणकारी योजनांचे फॉर्म, तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याबाबत चर्चा विनिमय झाला.
हे अभियान यशस्वी होण्यासाठी विजय साने, चेतन शिंदे, बाळासाहेब वाल्हेकर, सुरेश राक्षे, राहूल पोंगडे, अमित सुहासे, अमित निंबाळकर, प्रकाश घोरपडे, स्वरूपा खापेकर, पूर्वा निंबाळकर, किर्ती घोरपडे, अविनाश कवडे, अतुल पोंगडे, अमित खरात, मछिंद्र देशमुख, विवेक तितरमारे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, भाग्यश्री म्हस्के, शारदा वाघमोडे, अमोल राठोड, सुहास शहाळे, गणेश आहेर, सुधा नाईक, गणेश वायभट,अनिल पालांडे,अंकुश कोळेकर,नरसिंग माने, शिल्पा अनपन, कमल गोडांबे,श्वेता कापसे,भाग्यश्री म्हस्के,उषा अल्हाट, तेजस्वी गायकवाड, वंदना वाल्हेकर,आशा पवार, सारीका शिंदे, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे,शहर प्रमुख योगेश बाबर,शहर संघटिका उर्मिला काळभोर,विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, महीला युवसेना अधिकारी शर्वरी जळमकर, यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. व आजी माजी शिवसैनिकांच्या भेटी गाठी घेऊन ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अभियानाची संकल्पना समजून सांगितली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी प्रत्येक शाखेच्या माध्यमातून सक्षमपणे नगरसेवक, लोकप्रतिनिधीला साजेसे समाजहिताचे काम प्रभागनिहाय शाखा प्रमुखांनी करावे, ह्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद पक्ष देईल, असे आश्वासन दिले.















