न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरणाच्या वतीने वारकऱ्यांसाठी औषधांसह रुग्णवाहिका व डॉक्टर्स रवाना झाले. या टीमने जेजुरी जवळच्या वाल्हे येथे आरोग्यसेवा केली.
वारकऱ्यांची चिंचवड स्टेशन येथे आरोग्य तपासणी केली. यामध्ये सुमारे १०० वारकऱ्यांची तपासणी केली. तसेच गरजूंना औषधे देवून रुग्णसेवा केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रस्टचे डॉ. रमेश बंसल, डॉ. संतोष आगरवाल, डॉ. शर्मा, डॉ.बाफना, डॉ. शर्मा, डॉ. वैद्य यांनी वारकऱ्यांची तपासणी केली. यासाठी यासाठी प्रेमचंद मित्तल, विनोद बंसल, विजय आगरवाल, सुनील विजय आगरवाल, निरंजन आगरवाल, अनिल आगरवाल, रमेश गोयल, पवन गोयल, देविचंद तुळजापूरकर, राजकुमार गुप्ता, वेदप्रकाश गुप्ता, अनिल रामगोपाल आगरवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.















