न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- दि. इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अकौन्टट ऑफ इंडियाची दिनांक २८ जून २०१९ रोजी सेन्ट्रल आणि रिजनल कौन्सिल २०१९ निवडणूक संपन्न झाली.
यात दि इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अकौन्टट ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टरचे माजी अध्यक्ष महेन्द्र भोंबे हे इन्स्टिटयुटच्या पश्चिम विभागीय (Western Region) शाखेमधून मोठ्या मताने निवडून आले.
पिंपरी-चिंचवड-आकुर्डी चैप्टर संस्थेचे अध्यक्ष जयंत हांपिहोळी तसेच सर्व सभासदांनी आणि पदाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.















