न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून देण्यासाठी मतदार नोंदणी मोहीम भारत निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येते. पदवीधर मतदारसंघाची जुनी मतदार यादी व नाव नोंदणी आयोगाकडून रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व पदवीधर, पदविकाधारकांनी पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी आपले नाव मतदार यादीत नव्याने नोंदविणे आवश्यक आहे.
यासाठी कोणत्याही शाखेची पदवी किंवा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा अथवा तीन वर्षांचा अन्य कोणत्याही विषयाचा डिप्लोमा, भारतातील कोणत्याही विद्यापीठाची पदवी, १ नोव्हेंबर २०१० पूर्वीचा पदवीधर किंवा पदविकाधारक व्यक्ती पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहे. मुक्त विद्यापीठ, अभिमत विद्यापीठाची पदवी घेणाराही नाव नोंदविण्यास पात्र आहे.
या मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पदवीधर, डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा शेवटच्या वर्षीची गुणपत्रिका, आधार कार्ड, दोन फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. पिंपरी विधानसभेतील पदवी व पदविका धारकांना नव्याने नाव नोंदविण्यासाठीची सोय नगरसेवक शैलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली आहे. तसेच ज्यांना कार्यालायात जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी कार्यालयीन प्रतिनिधी थेट पदवीधर यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून अर्ज भरून ते जमा करण्याची सोयही नगरसेवक मोरे यांनी केली आहे. त्याकरीता नगरसेवक शैलेश मोरे यांचे मुंबई-पुणे रोडवरील एम्पायर ईस्टेट येथील कार्यालय अथवा त्यांच्या ७८८७८८७९३८ / ९०४९७२२२८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक मोरे यानी केले आहे.











