न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- शरद नगर येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू महाराज विद्यालयात निसर्ग दिंडी काढून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली. सचिव लहू कांबळे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या गाथेचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी बोधिसत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, मुख्याध्यापक बाबाजी शिंदे आदी उपस्थित होते.
शरद नगर, साने चौक, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, घरकुल चौकातून शरद नगर या परिसरातून दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्ग हाच गुरू,ग्रंथ हेच गुरु, झाडे लावा झाडे जगवा, सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा, घन कचरा व्यवस्थापन ला मदत करा, बेटी बचावो, बेटी पढाओ, स्वच्छ असे जिथे, आरोग्य वसे तिथे, ना गंदगी करेंगे, ना करणे देंगे, पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
सूत्रसंचालन रूपाली पवार यांनी तर, आभार विकास म्हस्के यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंकज कांबळे, स्वाती पाटील, देवेंद्र पाटील, दिनकर रनवरे, सुजाता जोगदंड, कोमल गायकवाड, सुवर्णा आरोटे, पूनम सुरवसे, क्रिडा शिक्षक संतोष घरडे, जितेंद्र सूर्यवंशी, प्रमोद रायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.











