न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- पिंपरीत म्हाडा इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी अनेक मजूर काम करीत आहेत. एका इमारतीवर क्रेनमध्ये उभा राहून प्लास्टरचे काम करीत असताना क्रेनचा ब्रेक फेल झाल्यामुळे एकोणिसाव्या मजल्यावरून पडून मजुर गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल केले असता त्या मजूराचा मृत्यु झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
क्रेन कोसळताना त्याखाली काम करणारे दोन मजूरही किरकोळ जखमी झाले आहेत. हा प्रकार बुधवार (दि. १०) रोजी पिंपरीत घडला. राजकुमार घोसले (मूळ रा. छत्तीसगड) असे मृत्यु झालेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. पिंपरी पोलीस पुढील घटनेचा तपास करीत आहेत.















