- अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनाचे आयोजन करावे – अमित गोरखे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे नियोजन सुयोग्यपणे करण्याच्या सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या पूर्व तयारीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीस लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास विकास महामंडळाचे सदस्य मनोज तोरडमल, विधी समिती सभापती आश्विनी बोबडे, क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसदस्य संदिप वाघेरे, माऊली थोरात, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, समाज विकास अधकारी संभाजी ऐवले, उपअभियंता विजय भोजने यांच्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, प्रा. धनंजय भिसे, सागर गायकवाड, नितीन गुलाबराव घोलप, हनुमंत कसबे, सुरेश जोगदंड, सुनिल भिसे, सचिन वाघमारे, विनोद खुळे, गणेश अडागळे, युवराज दाखले, शंकरभाउ तडाखे, मयुर लोंडे, स्वप्नील नेटके, संतोश राम ससाणे, हरीश शेलार, मनोज आडागळे, अनंत तलगे, दिपक अडागळे, रमेश शिंदे, धनराज थोरात, राजेश आण्ण झोबांडे, अंगुर विनयक कसबे, विनायक मोहिते, सचिन कुचेकर, आशाताई शहाणे, बाळासाहेब शिंदे, दिपक चखाले, किशोर खंडागळे, अनिल गाडे, आण्णासाहेब कसबे, राजू आवळे, रोहित लोणारे, दशरथ सकट, राजेश आरसुळ, विद्या जाधव, महेश खिलारे, एकनाथ नामदास, भगवान शिंदे, अविनाश सोजवारखे, संदिप आल्हाट, मोहन वाघमारे, किशोर हातागळे, रामदास भांडे, धमेंद्र क्षिरसागर, कसन वाघमारे, बाजीराव भोरे, बाळासाहेब खंदारे, हरीश साळवे, हिवाळे अक्षय, अर्जुन नेटके, युवराज उपाडे, शिवाजी गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
महापौर राहूल जाधव म्हणाले, सर्व समाज बांधवांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शहर वासियांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. पवनाथडी व भीमथडी जत्रेच्या धर्तीवर वाटेगाव जत्रा, अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव, पारंपारिक स्पर्धांचे नियोजन तसेच लहूजी वस्ताद साळवे मेट्रो नामकरण करणेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा प्रबोधनपर्व कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नसावा, कारण अण्णाभाऊंचे साहित्य व त्यांचे कार्य सर्वसमावेशक होतं असेही ते म्हणाले.
यावेळी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शासन योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. सर्व स्तरातील समाज बांधव या प्रबोधन पर्वात सहभागी असतात. या प्रबोधन पर्वात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जीवन पटावर आधारित पुस्तके द्यावीत, तसेच विविध महापुरुषांच्या जीवनावरील चित्रपट / लघुपट दाखवावेत. असे ते म्हणाले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वासाठी निधी कमी पडू देणार नाही. या पर्वानिमित्त समाजातील शालेय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात यावे.
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुस्कार देणेबाबत महापालिका सभेत ठराव पारित करुन शासनाकडे पाठविण्यात यावा. समाजातील १० विद्यार्थ्यांचा एमपीएससी व युपीएससी साठी येणारा खर्च महापालिकेने करावा. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे. असे ते म्हणाले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भवाळ, सुनील भिसे, धनंजय भिसे, युवराज दाखले यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनीही अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाबाबत आपल्या सूचना मांडल्या.
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.











