न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड मनपाच्यावतीने औषधे खरेदीसाठी येणा-या सुमारे १६ कोटी ४९ लाख रुपये खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ९० कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
प्रभाग क्र. २ मोशी देहू आळंदी स्त्याच्या बाजूच्या परीसरातील भागात पेव्हींग ब्लॉक व गटर्स करणेकामी येणाऱ्या सुमारे २९ लाख ४२ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृतीसाठी येणाऱ्या सुमारे २५ लाख रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्रीडा प्रबोधनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन पुरविणेकामी येणाऱ्या सुमारे १८ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ८ मधील से.क्र. १ भूखंड क्र. १ मधील स्केटींग ट्रकची उर्वरित कामे येणाऱ्या सुमारे १ कोटी ३० लाख ४६ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२६ वाकड पिंपळे निलख रोड लगतची जागा येथे लिनिअर गार्डन विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ३५ लाख ८८ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. क्षेत्रीय कार्यालयासाठी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या सुमारे २५ लाख खर्चास या बैठकीत मान्यता
देण्यात आली.
माध्यमिक शिक्षणाविभागा अंतर्गत घडयाळी तासिकेवर शिक्षक नेमणुकीसाठी येणाऱ्या सुमारे ७४ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग यांचेसाठी फर्निचर साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या सुमारे ६२ लाख ४५ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १४४ पात्र खंळाडूंना प्रोत्साहनासाठी क्रिडा शिष्यवृत्ती देण्यासाठी येणाऱ्या सुमारे ६ लाख २२ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जागतिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या अभिश्रृत देवकर व कॅमिला पटणायक या खेळाडूस आर्थिक सहाय्य अदा करणेकामी येणा-या सुमारे ४ लाख ९९ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२० मधील कासारवाडी येथील रेल्वेलाईनच्या कडेने नाले विकसित करणेकामी येणा-या सुमारे २ कोटी ९४ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलनि:सरण विभागाच्या “अ” क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिक पद्धतीने करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी २९ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. जलनि:सरण विभागाच्या “ब” क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिक पद्धतीने करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी २९ लाख खर्चास बैठकीत मान्यता
देण्यात आली. जलनि:सरण विभागाच्या “क” क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची साफसफाई आधुनिक यांत्रिक पद्धतीने करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी २९ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे नुतनीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे ६६ लाख ३० हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तळवडे गायरान अंतर्गत पाथवे (रस्ता) करणे व इतर कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ४१ लाख ६३ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तळवडे गायरान येथील सीमाभिंत दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या सुमारे ४१ लाख ५३ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या सुमारे ७२ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक मुख्य रस्त्याचे फुटपाथ व डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या सुमारे ४ कोटी ९८ लाख ५३ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांना पादत्राणे व सॉक्स व पी.टी.शुज देण्यासाठी येणाऱ्या सुमारे १० कोटी ५० लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी वाघेरे गावातील भैरवनाथ मंदीर येथे बहुउद्देशीय ईमारत बांधणेकामी येणाऱ्या सुमारे ५ कोटी ८१ लाख २८ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २ जाधववाडी मधील नियोजित रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ३ लाख ५६ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३ मधील डि.पी.रस्त्यावर विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ९१ लाख ७२ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २ मधील ताब्यात आलेल्या डि.पी.रस्त्याला प्रकाश व्यवस्था करणेकामी येणाऱ्या सुमारे १ कोटी ३० लाख ४६ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. १९ मधील ताब्यात आलेल्या आरक्षणे विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे ८२ लाख ९४ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. संजय काळे मैदान विकसित करणेकामी येणाऱ्या सुमारे ७३ लाख ८५ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
दवाखाने व रूग्नालयांसाठी २ वर्षाचे कालावधीत आवश्यक असलेली औषधे/साहित्य खरेदीकामी येणाऱ्या सुमारे १६ कोटी ४९ लाख ६० हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ७१ झोपडपट्टया मधील शौचालयाची दुरूस्ती व डागडुजी
करणेकामी येणाऱ्या सुमारे ४१ लाख ७४ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. झोपडपट्टयांमध्ये उर्वरित ठिकाणी मलनि:सारण व्यवस्था करणेकामी येणाऱ्या सुमारे ४४ लाख ९९ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. कासारवाडी मैला शुध्दीकरण केद्राअंतर्गत वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेबरची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या सुमारे २९ लाख ९६ हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
चिंचवड मैला शुध्दीकरण केद्राअंतर्गत मोरवाडी परिसरात जलनि:सरण नलिका टाकणे व जलनि:सरण विषयक सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे २९ लाख ९९ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. विजयनगर, पवनानगर, नढेनगर, कोकणेनगर, राजवाडेनगर व ईतर परिसरातील जलनि:सरण विषयक सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे ५९ लाख ६७ हजार खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर व पावसाळी साधणे खरेदीसाठी येणाऱ्या सुमारे २ कोटी ५५ लाख रुपये खर्चास् बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २ मधील ताब्यात आलेल्या जागेस सिमाभिंत बांधणेकामी येणाऱ्या सुमारे ६ कोटी १ लाख ३० हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.















