न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची तहकूब सभा आज शुक्रवार (दि. १२) रोजी पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते. या बैठकीत दोन वर्षाचे कालावधीत आवश्यक असलेली औषधे / साहित्य खरेदीकामी सोळा कोटी एकोणपन्नास लाख साठ हजार रुपयांच्या औषध खरेदीस मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दवाखाना व रुग्णालयासाठी दोन वर्षाचे कालावधीत आवश्यक असलेली औषधे / साहित्य खरेदीकामी E – Tender No. १६ / १ ते ४ / २०१८ – २०२० अन्वये उत्पादित कंपनी / वितरक यांचेकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यापैकी E – Tender No. १६ / १ / २०१८ – २० ऍलोपॅथी औषधांसाठीची निविदा असून तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे औषध निवड समितीने तांत्रिक दृष्टया पात्र ठरविलेल्या २१ निविदाधारकांपैकी १९ निविदाधारकांचे ६९० बांबीसाठी दर प्राप्त झालेले होते. त्यापैकी ३९१ बाबींसाठी अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा कमी व २९९ बार्बीसाठी अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा जास्त दर प्राप्त झालेने कोणत्या निविदा स्विकृत कराव्यात याबाबत औषध निवड समितीपुढे विषय सादर केला होता.
सदर औषध निवड समितीने शिफारस केले नुसार ६९० बाबींपैकी ०७ बाबी वगळता ६८३ बाबींकरीता प्राप्त दरानुसार र. रु. १६, ४९, ६०, ७४६.१० (अक्षरी र. रू. सोळा कोटी एकोणपन्नास लाख साठ हजार सातशे शेहेचाळीस दहा पैसे फक्त ) + जी एस टी कर याप्रमाणे अपेक्षित खर्च सोबत प्रपत्र ‘ अ ‘ जोडले होते. त्यानुसार संबधित उत्पादित कंपनी / वितरक यांचेकडुन प्राप्त लघुतम दरानुसार दोन वर्षाचे कालावधीत ऍलोपॅथी औषधे आवश्यकते प्रमाणे वेळोवेळी खरेदीकामी करारनामा करणेस व संबंधित आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकीय तरतुदींचे मर्यादेत प्रत्यक्ष येणारे खर्चास स्थायीने मान्यता दिली.















