न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी वारक-यांचा वेष परिधान करून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपट नखाते, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत यांच्यासह राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातिल अनेक मान्यवर तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











