- कुदळवाडीत स्वी. नगरसेवक यादव यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सचिन भैय्या किसनराव लांडगे यांची निवड झाल्याबद्दल कुदळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्काराच्या कार्य्क्रमचे आयोजन स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी केले होते.
तसेच याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा कुदळवाडी परिसरातील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांना कै. वामन महाराज यादव याच्या स्मरणार्थ फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.


कार्यक्रमास कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, हनुमंत आण्णा लांडगे, नगरसेवक संतोष मोरे, सुनिल कदम, नगरसेविका आश्विनी जाधव, चिखली पोलिस स्टेशनचे मुख्य राजकुमार शिंदे, जाधवड साहेब, शंकर यमगरसाहेब, संरपच काळुराम यादव, चेअरमन दत्तात्रय मोरे, किसन आप्पा यादव, बाळासाहेब पवार, चांगदेव बालघरे, लालचंद यादव, रामकृष्ण लांडगे, विजयराज यादव, प्रसाद मायभट्टे, विजय तापकीर, रूपेश हरगुडे, हरहरे काका, राजेंद्र पाठक, सुरेश वाळुज, अक्षय यादव, विशाल यादव, सुनिल यादव, गणेश यादव, अमित बालघरे, राजेश डोंगरे, मोईद शेख, किशोर लोंढे, आकाश किवळे, रामकुमार मनोज मोरे, शाम थोरात, करण पाखरे, कोस्तुभ यादव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काका शेळके यांनी केले.











