न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०१९) :- मोटारसायकलची धडक बसल्याने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ताथवडे येथील पवारवस्ती येथे बुधवारी (दि. १०) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम दत्तू इल्लाळे (वय ४०, रा. पवारवस्ती, ताथवडे) असे मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. मृत्यू झालेल्या राम इल्लाळे यांचा मुलगा आकाश राम इल्लाळे (वय १९, रा. पवारवस्ती, ताथवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोटारसायकलच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.















