- नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचे रिक्षा संघटनेच्या वतीने स्वागत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- काही समाजकंटक बोगस इन्शुरन्स रिक्षामालकास कमी पैशात काढून देतो, असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची व वाहन मालकाची फसवणूक करीत असून, रिक्षाचालकांची देखील फसवणूक करीत आहेत. याबाबत पुण्यातील रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ अजित शिंदे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.
अशा बोगस कंपन्यावर आणि इन्शुरन्स काढण्याऱ्या एजंटवर ताबडतोब कारवाई करू तसेच हे इन्शुरन्स तपासण्याची यंत्रणा आरटीओमध्ये राबवण्यात येईल, पूर्वी इन्शुरन्स तपासणी होत नव्हती. ती आता ऑनलाइन वरून वाहन ४ वर तपासूनच गाड्या पासिंग व इतर कामे केली जातील, असे आश्वासन अजित शिंदे यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळास दिले.
पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून अजित शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. या निमित्त त्यांचा जेष्ठ रिक्षाचालक शिवाजी जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद तांबे, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, चंद्रकांत गोडबोले, शिवाजीनगर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय रवळे, सुरेश जगताप, महाराष्ट्र वाहतूक पंचायत उपाध्यक्ष विकी तामचीकर, अंगराज भिसे, मुकेश धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते.











