न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- निगडीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका यांना धमकी देत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. आपल्या पतीसोबत आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्राधिकरणात गेलेल्या त्या नगरसेवका मुलीला भेटून दुपारी एकच्या सुमारास परत येत असताना, आरोपीने त्यांची fortuner car निगडीतील भक्ती-शक्ती चौकात नगरसेविकेच्या मोटारीला आडवी घालुन ती थांबवली.
त्यानंतर कार चालक खाली उतरून नगरसेविकेला धक्काबुक्की करत म्हणाला की, ”माझ्या मालका विरोधात तक्रार का केली? तसेच कारमध्ये बसलेल्या काळे यांनी अश्लील हावभाव करून, नगरसेविकेचा विनयभंग केला व नगरसेवीकेच्या अंगावर कार घालण्यास सांगितले. चालकानेही आपल्या ताब्यातील कार नगरसेविकेच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणी कार चालक व अशोक काळे (वय ५७ रा. चिंचवड) या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे पुढील तपास करीत आहेत.












