न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०१९) :- माझा महाराष्ट्र – भगवा महाराष्ट्र अभियान अंतर्गत विधानसभानिहाय, प्रभागनिहाय जनसंपर्कासाठी संपर्क कार्यालये व शाखा सुरू करण्यात येत आहेत. मावळ लोकसभा अंतर्गत चिंचवड विधानसभा शिवसेना विभागीय कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार गौतम चाबूकस्वार यांच्या शुभहस्ते रविवार दि. १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गजानन चिंचवडे यांचे संपर्क कार्यालय चिंचवड येथे होणार आहे.
तसेच यावेळी पिकविमा कंपनी विरोधात मोर्चा, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन याबाबत चर्चा विनिमय होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका अनिता तुतारे, सरिता साने, युवासेनेचे जितेंद्र ननावारे, विश्वजित बारणे, अभिजीत गोफण, शर्वरी जळमकर, प्रतिक्षा घुले, व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व शिवसैनिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












