न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील जी. के. पॅलेसिओ सोसायटीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त उद्या मंगळवार (दि. १६) रोजी साई भंडारा व सुमधुर साईभक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी साई पालखी मिरवणुक, साईंची आरती, सुमधुर साईभक्ती गीतांचा कार्यक्रम, साईभंडारा व महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सर्व साई प्रेमींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.












